तुला माहितीये का? त्या कबीर बेदीनी चौथं लग्न केलं म्हणे!
कोण कबीर बेदी??
अशी काय ही? हिला कबीर बेदी माहीत नाही?? काय poor GK आहे हिचं? ![]()
अगं, त्या पूजा बेदीचा बाप! प्रोतिमा बेदीचा नवरा! आठवलं का आता तरी?
“खून भरी माँग” सिनेमात नाही का, त्या सोनू वालिया साठी रेखाला पाण्यात ढकलून देतो? तेव्हा किती चिडली होतीस तू त्या सोनू वर!
मला कबीर बेदी नाही आठवत. पण तुला सोनू वालिया आठवते याची मी दाद देते बरं का! अजूनही मेमरी शार्प आहे तुझी ![]()
पण त्याचं काय झालं?
चौथ लग्न झालं. वयाच्या ऐंशी व्या वर्षी. आहेस कुठे? ते ही २९ वर्षांनी त्याच्याहून लहान असलेल्या मुलीशी!
पण त्याच्याशी आपला काय संबंध? तुम्ही का सगळ्या एवढी चर्चा करताय?
धन्य आहे बाई हिची. ऐंशीव्या वर्षी त्याने परत लग्न केलंय. याचं आश्चर्य नाही वाटलं तुला?
बघ ना! आपण इथे सात जन्म एकच नवरा मिळू दे म्हणून वडाला फेऱ्या मारतोय आणि तो एकाच जन्मात चार चार??
पण तुम्ही का जळताय? बडे लोग़, बडी बातें! म्हणा आणि सोडून द्या.
हो ना, आम्ही आपले साठीतच टक्कल पडलेल्या, ढेरपोट्या, बीपी डायबिटीस बाळगणाऱ्या नवऱ्यांसाठी वड पुजतोय आणि हा कस्सला हँडसम दिसतो गं या वयात सुद्धा! आणि त्याला त्याच्या पोरीच्या वयाची बायको मिळते आहे.
मग? तुला चालणार आहे का तुझ्या नवऱ्याला तुझ्या पोरीच्या वयाची तिसरी चौथी बायको मिळाली तर? आणि आपली अस्ताव्यस्त वाढलेली वजनं, विरळ झालेले केस, डोळ्यावर लावलेली भिंगं, याचा विचार कोणी करायचा?
अगं, माझ्या नवऱ्याला कशाला मिळायला हवी चौथी बायको? मला त्याच्यासारखा हँडसम, डॅशिंग् आणि चिक्कार पैसेवाला नवरा मिळू शकतो ना? मी वडाकडून सात काय, चौदा जन्म मागून घेईन त्याला!
आज काय सगळ्या “काही खाऊन पिऊन” आल्या आहात का? दिवास्वप्न रंगवताय ते!
मला हृतिक पण चालेल बरं का मैत्रिणींनो!
![]()
![]()
![]()
![]()
वय बघ आपलं आरशात!
मी का बघू? तुला नाही का आदिनाथ कोठारे आवडतो?
मैत्रिणींनो, जरा तोंडाला आवर घालणार असाल तर मी बोलू का?
बोल बोल, तुला कोण आवडतं?
मला नाही कोणी आवडत. पण मी आत्ताच कबीर बेदी गुगललय! त्याचं प्रोतिमा बेदी बरोबर ओपन मॅरेज होतं. म्हणजे काय माहित आहे का?
नाही माहित. तू सांग ना!
म्हणजे डिव्होर्स नाही घ्यायचा, पण हवं त्याच्याबरोबर अफेअर करायला दोघंही मोकळे! म्हणजे मुलांची जबाबदारी घ्यायची पण बाकी “तुझं तू माझं मी”
का sssss य? ![]()
![]()
आता तुम्हीच विचार करा. असे विचार तरी झेपणार आहेत का आपल्या सारख्या मध्यमवर्गाला? ते ही आपल्या पिढीला? नवऱ्याने शेजारून जाणाऱ्या बाईकडे मान वळवून बघितलं तरी चेहरा पडणारी माणसं आपण! म्हणून म्हटलं, बडे लोग, बडी बातें!! काय समजलात? ![]()
तू तर आमच्या स्वप्नांचा फुगाच फोडलास! चला बाई, जाऊ आता घरी. आपापल्या टकल्या, ढेरपोट्यांकडे जायची वेळ झाली. तोच आपला कबीर आणि तोच आपला हृतिक!! ![]()
![]()
![]()
आता उद्या वॉक ला येऊ ना, तेव्हा मी खरे GK चे प्रश्न विचारणार आहे बरं का! हे हिरो हिरोईन नकोत आपल्याला.
ओक्के टीचर. बाय बाय! ![]()
![]()
महत्त्वाची टीप : वॉकला गेल्यावर मी या ग्रुपच्या मागे मागे चालते! मुद्दाम..
रोज काहीतरी ज्ञानामृत मिळतं! ![]()
![]()
( पण कबीर बेदी हँडसम दिसतो हे मी ही मनोमन मान्य करूनच टाकलं!
)
After all, age is just a number! You know ![]()
संध्या घोलप


Leave a Reply