कंदील

आजकाल ज्येष्ठ नागरिकांना, मेंदू तल्लख रहावा यासाठी सतत सल्ला दिला जातो की ज्येष्ठ नागरिकांनी काहीतरी लिहित रहावे (कागद पेन वापरून, मोबाईलवर नाही) , काहीतरी नवीन शिकावे – एखादी कला, एखादी भाषा. त्याला वयाची अट नसते, नसावी. यात ब्रेन Excercises साठी बोटांची हालचाल दाखवणारे बरेच videos, you tube वर उपलब्ध आहेत.

आमच्या इथे अथश्री मध्ये, पेंटिंगचा क्लास आहे आणि त्यात ८५ वयाच्या पुढच्या “विद्यार्थ्यांना” पाहून मी चकित झाले होते. त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन पाहून तर हातही जोडले. Passion म्हणजे काय हे त्या ज्येष्ठांकडे बघून लक्षात येतं.

या दिवाळीत सर्वांनी मिळून छोटे आकाशकंदील केले. आमची अथश्री, स्वहस्ते केलेल्या छोट्या कंदिलांनी नटली होती.

रोज दुपारी ४ ते ६, वामकुक्षी बाजूला सारून, सगळ्या महिला एकत्र येत होत्या. गप्पा मारत मारत कंदील करत होत्या, खूप लोभस दृश्य होतं ते.

मी पण नवीन काहीतरी शोधत असते. वाचन तर चालूच असतं पण त्याबरोबर विणकाम, cross stitch, मंडला, doodle, लेखन चालू असतं.

या वर्षी छोटे पण वेगळे कंदील करायचं ठरवलं. गुगलला आपल्या मनातलं सगळं कळतं असं वाटतं. ज्या दिवशी हे मनात आलं त्याच दिवशी अमेझॉन वर १२०/- रु ला A4 आकाराचे 100 रंगीत कागद उपलब्ध होते. बाकी कात्री, फेविकॉल, पट्टी पेन्सिल होतच घरात.

एकदा कंदील किंवा snowflakes ची मूळ कल्पना समजली की आपलं डोकं भराऱ्या मारायला मोकळं.

मी खूप कंदील केले, शेजारी मैत्रिणींना पण दिले.

“आता पुढच्या वर्षी असेच कंदील आपण सगळ्या मिळून “अथश्री” साठी करूया. तू शिकव आम्हाला” अशी ग्वाही मिळाली लगेच.

बघा तुम्हाला पण काही नवीन छंद सुचतो आहे का. 😀

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading