आजचा बेत — गरम गरम मटर पराठे, दही, आमटी भात! ताजे ताजे मटार असल्यावर काहीतरी करायलाच पाहिजे. पण एकटीसाठी करंज्यांचा घाट घालायचा नव्हता. त्या उरलेल्या तेलाचं काय करायचं असा प्रश्न पडतो. मध्यमवर्गीय मन टाकू देत नाही आणि शरीर खाऊ नको म्हणतं.
मग पराठ्याचं सारण करून ठेवलं की दोन दिवस गरम गरम पराठे खाता येतात.
तर मटार वाफवून घेतले. ताजे आणि कोवळे होते त्यामुळे वेळ लागला नाही. आलं लसूण मिरची वाटून, धणे थोडेसे कुटून घेतले. कढईत तेल घेऊन जिरं हिंग हळद फोडणी करून त्यात वाटलेला मसाला घातला. वर मटार घालून आमचूर पावडर, तिखट, मीठ, धणे जिरे पावडर, नारळ, कोथिंबीर घालून smasher ने मटार थोडे चेचून घेतले. Binding साठी एक उकडलेला बटाटा घालून सगळं छान mix केलं आणि गरम गरम पराठे, दह्याबरोबर फस्त केले.
संध्या घोलप



Leave a Reply