हाँगकाँट्रिप भाग ५

Big Buddha’s statue च्या पायऱ्या चढल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. आज आमचा दौरा “10 thousand Buddha Monastery” ठरला होता.

हाँगकाँग मधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं विशेष कौतुक करायला हवं. छोटी मोठी बेटं असलेलं हाँगकाँग, एकमेकांना बस, मेट्रो, ट्राम ने इतकं व्यवस्थित जोडलं गेलं आहे आणि सगळ्याचे वेळापत्रक पाळले जात असल्याने, कुठूनही कुठेही तुम्ही आरामदायक प्रवास करू शकता. आम्हाला प्रवासात कुठेही विशेष गर्दीही जाणवली नाही. सगळ्या प्रवासात बसायला आरामात जागा मिळाली. तिथेही बसमधल्या काही जागा ज्येष्ठांसाठी राखीव असतात. आणि तिथे ज्येष्ठ बसलेले नसतील तरीही त्या जागा रिकाम्या ठेवल्या जातात. “आहे रिकामी तर घ्या बसून” असा प्रकार नसतो.

आम्ही राहत असलेल्या सेंट्रल हाँगकाँग मधून दुसऱ्या बेटावर, उत्तर टोकाला असलेल्या Sha Tin ला आम्हाला जायचं होतं. गुगल मॅप च्या मदतीने आम्ही दोन बस बदलून दीड तासात तिथे पोहोचलो.

आमचा टॅक्सी प्रवासाचा अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यामुळे शक्य असेल तिथे आम्ही बस, ट्राम ने आरामात प्रवास करत होतो.

Sha Tin इथली Ten thousand Buddha Monastery उंचावर आहे आणि तिथे ५०० पायऱ्या चढून जावं लागतं. अर्थातच इथे फक्त “भक्त” लोक येतात, पर्यटक एवढा त्रास घेत नाहीत. तीन चार फुटाचा छोटासा रस्ता, त्यात अर्ध्या भागात चढत्या पायऱ्या आणि अर्ध्या भागात स्टीप स्लोप असलेला रॅम्प. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बुद्धाच्या वेगवेगळ्या स्थितीतल्या प्रतिमा! सोनेरी रंगाने रंगवलेल्या या मूर्ती बघत बघत आम्ही सावकाश वर चढत होतो. दम लागला की थोड्या थोड्या अंतरावर बसायला बाक होते.

वर चढून गेलो आणि मोठ्ठी monastery समोर दिसली. खूप मोठा परिसर, समोर ९ मजली पॅगोडा, मोठे पुतळे आणि मॉनेस्ट्रीच्या आत १३ हजार बुद्धाच्या मूर्ती! गर्दी असूनही कुठे गोंधळ नाही, आवाज नाही! जवळजवळ ७० वर्षांपूर्वी एवढ्या उंचावर बांधलेली ही Monastery सुंदर आहे. एवढ्या उंचीवरून सभोवार दिसणारे हाँगकाँग चे दृश्य ही अप्रतिम!

खाली उतरलो आणि Tai Wai भागात असलेल्या Che Kung temple ला पुन्हा बस करून गेलो. मिलिटरी मधल्या एखाद्या जनरल साठी बांधलेलं एवढं मोठं देऊळ पाहून आश्चर्य वाटलं. दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला इथे जत्रा भरते! या देवळाला भेट देणं हे ” good luck” समजलं जातं. देवळातला Che Kung चा पुतळा ४० फूट उंच आहे. या देवळात आणि देवळाबाहेर मात्र खूप गर्दी होती.

देवळाबाहेर ६-७ फूट उंच उदबत्त्या लावल्या होत्या. या मात्र सगळ्याच देवळात बघायला मिळाल्या. विविध लांबीच्या उदबत्त्या विकत घेऊन त्या देवासमोर लावतात आणि तिथले सेवक, छोट्या उदबत्त्या लगेच पाण्यात घालून विझवतात! 😀
आपल्याकडे असतात तसे जत्रेबाहेर सोव्हेनियर विकणारे छोटे छोटे स्टॉल्स होते. आपल्याकडे काही ठिकाणी छोट्या घंटा बांधतात तसे इथे व्हील ऑफ fortune बांधत होते.

मी खरं तर जगभर खूप फिरले आहे. पण तेव्हा लिहित नव्हते! नाहीतर New Zealand, Japan आणि Scandinavia बद्दल लिहायला नक्कीच आवडलं असतं.
आता पुढच्या ट्रिप पर्यंत … निवांत!!

संध्या घोलप

Leave a Reply

Discover more from SANDHYA GHOLAP

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading